ट्विटरला माणसांपेक्षा मच्छरांचा अधिक पुळका


नवी दिल्ली: मित्रांनो, या बातमीमुळे तु्म्हाला मच्छरांपासून अधिक भीती वाटेल. कारण एका मच्छरमुळे जपानमधील एका व्यक्तीचे ट्विटर अंकाऊट बंद करण्यात आले असून ते पुन्हा कधीही चालू करता येणार नाही; असेही ट्विटरने या वापरकर्त्याला कळविले आहे.

सोशल मीडियावर शिवीगाळ करणे, अपमान करणे यावरून अनेकांचे ट्विटर अंकाऊट बंद करण्याचे आपण ऐकले असेल. पण जपानमधील एका व्यक्तीचे ट्विटर अकाउंट बंद करण्याचे कारण मच्छर ठरला आहे. नुकतीच ही घटना घडली. टीव्ही पाहत असताना @nemuismywife नावाच्या यूजरचा एका मच्छरने अनेकवेळा चावा घेतला. शेवटी कंटाळून त्याने त्याला मच्छरला मारले. त्याचा फोटो ट्विटरवरून शेअर केला. त्याखाली त्याने लिहिले, मी टीव्ही पाहत असताना तू मला खूप वेळा चावला. तुला मला चावून काय मिळाले. जा आता मर…

काही वेळेनंतर या व्यक्तीला ट्विटरकडून एक संदेश आला की तुमचे अंकाऊट बंद करण्यात आले. त्याला परत अॅक्टीव्हेट करता येणार नाही. त्यानंतर या व्यक्तीने @DaydreamMatcha या नावाने नवीन अंकाऊट उघडले. यात त्याने ट्विटरच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. त्याने ट्वीट केले की माझे मागील अंकाऊट तुम्ही बंद केले. कारण मी मच्छरला मारले होते. मच्छरला मारणे हे तुमच्या नियमांचे उल्लंघन आहे का? या त्याच्या ट्वीटने बहुसंख्य वापरकर्त्यांनी त्याच्या भावनाशी सहमती दर्शविली आहे. या ट्वीटला ३१ हजार जणांनी रिट्वीट केले आहे.

Leave a Comment