अॅपल फोन्सची प्रतीक्षा जगभरातील ग्राहक करत असतात त्यातच आता अॅपलचा कॅलिफोर्नियातील नवा कँपस चर्चेचा हॉट टॉपिक बनला आहे. एखाद्या स्पेसशीपच्या आकारात असलेल्या या ऑफिसजवळच गोल आकारात बांधले गेलेले स्टीव्ह जॉब्ज थिएटरही असाच चर्चेचा विषय ठरले असून या थिएटरमध्ये १२ सप्टेंबरला अॅपलचा नवा स्मार्टफोन लाँच केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर अॅपलचे भविष्यातील सर्व नवे फोन येथेच सादर केले जातील असेही समजते.
स्टीव्ह जॉब्ज थिएटरमध्ये होणार अॅपलचे नवे फोन लाँच
कॅम्पस परिसरात गोल आकारात दिसणारी ही इमारत जमिनीवर दिसत असली तरी त्यात प्रवेश करण्याचा मार्ग अंडरग्राऊंड आहे. इमारतीच्या मधोमध विशाल प्लॅटफॉर्म आहे व चारी बाजूंनी प्रेक्षकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था आहे. नैसर्गिक लाकडापासून या थिएटरचे फिनिशिंग केले गेले आहे तर छत कार्बन फायबर पासून बनविले गेले असून ते जमिनीपासून २० फूट उंच आहे व त्याला काचेच्या भिंती आहेत. या प्रेक्षागारात १ हजार लोक बसू शकतात व येथील प्रत्येक खुर्ची साठी १४०० डॉलर्स खर्च केले गेले आहेत असेही समजते.