याही महिला सांभाळताहेत संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी


मोदी सरकारच्या रविवारी झालेल्या मंत्रीमंडळ पुनर्रचनेत भारताच्या संरक्षणमंत्रीपदाची जबाबदारी निर्मला सीतारमण यांना दिली गेली आणि त्या पूर्ण कार्यभार असलेल्या पहिल्या संरक्षणमंत्री बनल्या. अर्थात जगभरातील अनेक देशांनी त्यांच्या संरक्षणाची धुरा महिलांच्या हाती दिली असून त्या ती यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्यांचीच ही माहिती


शेख हसीना- या बांगला देशाच्या पंतपधानपदी तिसर्‍यांदा विराजमान झालेल्या आहेत. शिवाय संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारीही त्या सांभाळत आहेत.


एमएम नकुला- दक्षिण अफ्रिकेच्या नकुला यांनी १२ जून २०१२ पासून देशाचे संरक्षणमंत्री पद अतिशय उत्तम प्रकारे सांभाळले आहे. त्यांनी यापूर्वी गृहमंत्री म्हणूनही काम केले आहे.


मॅरिस प्याने- ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणाचा भार मॅरिस यांच्यावर असून त्या २१ सप्टेंबर २०१५ पासून संरक्षणमंत्री म्हणून काम करत आहेत


जे.एस. प्लॅसचार्ट- प्लॅसचार्ट गेली पाच वर्षे नेदरलँडच्या संरक्षणमंत्री म्हणून काम पहात आहेत. त्या २०१२ पासून या पदावर आहेत.


फ्लॉरेन्स पार्ली- फ्रान्सच्या या संरक्षणमंत्री २१ जून २०१७ मध्येच या पदावर आल्या आहेत.


रॉबर्ट पिटोा- गेली तीन वर्षे म्हणजे २०१४ पासून पिटो इटलीच्या संरक्षणमंत्री आहेत.


एम.डी. कॉस्पेडल- यांनी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर पासून म्हणजे २०१६ नोव्हेंबर पासून स्पेनच्या संरक्षण मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.


टोमोनी इनाडा- याही २०१६ मध्ये जपानच्या संरक्षणमंत्री बनल्या आहेत.


युवी लेयन- गेली ३ वर्षे युवी जर्मनीच्या संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी पार पाडत आहेत.


एम कोटेली- याही गेली पाच वर्षे अल्बानियाच्या संरक्षण मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Leave a Comment