या बाबांनाही मिळते व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट


आजकाल देशात एकामागोमाग एक बाबा बुवांची प्रकरणे उजेडात येत असून या आध्यात्मिक बाबांच्या लिलांनी त्यांच्या भक्तगणांसाह सर्वच देशवासिय चकीत झाले आहेत. गुजराथेतील भरतदास या बाबांना सरकारी विभागाकडून व्हीआयपी कॅटेगरी दिली गेली आहे. मात्र ही कॅटेगरी चांगल्या कारणासाठी आहे. भरतदास बाबा हेही एका मंदिराचे महंत आहेत पण ते जेथे राहतात तेथे अन्य कुणीच रहात नाही.

मिळालेल्या माहितीनुसार गुजराथेतील गीर या दाट जंगलात असलेल्या एका मंदिराचे भरतदास महंत आहेत. जंगलात ३५ किमी आत हे मंदिर आहे व तेथे आसपास मनुष्यवस्ती नाही. या बाबांसाठी निवडणुका आल्या की खास सोय करावी लागते. निवडणुक आयोग या एका मतदारासाठी वेगळा स्वतंत्र मतदान कक्ष स्थापन करतो. याचे कारण असे की नियमाप्रमाणे कोणत्याही मतदाराच्या राहण्याच्या ठिकाणापासून किमान २ किमीवर मतदार कक्ष असला पाहिजे. परिणामी बाबांसाठी स्वतंत्र कक्ष उभारावा लागतो. त्यामुळे ते या भागातले सर्वात महागडे मतदार आहेत. अर्थात बाबा आवर्जून मतदान करतात. त्यांच्याविषयी कोणताही निवडणूक अधिकारी त्यांनी किती वाजता, कोणत्या निवडणुकीसाठी मतदान केले हे सांगू शकतो. बाबांजवळ मतदार ओळखपत्र आहे व मतदान हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही सोय सरकारला करावी लागते.

Leave a Comment