नंदन नीलेकणी करणार विनावेतन काम


आयटी अग्रणी कंपनी इन्फोसिसमध्ये नव्याने नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमनचा पदभार स्वीकारलेले नंदन नीलेकणी विनावेतन काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला माहिती देताना कंपनीतर्फे ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार नीलेकणी संचालक म्हणून रिटायरमेंट बाय रोटेशन रूल प्रमाणे हा कार्यभार सांभाळणार आहेत.

याप्रकारात कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळापैकी एक तृतीयांश संचालक राजीनामा देऊन पुन्हा निवडले जातात. १९८१ मध्ये नीलेकणी संचालक म्हणून आले व हे काम त्यांनी २००९ पर्यंत पाहिले. २०१० मध्ये त्यांना संचालक स्वरूपात ३४ लाख रूपये वेतन दिले गेले. त्याचबरोबर नीलेकणी यांच्याकडे इन्फोसिसचे इक्विटी शेअर्सही आहेत.

Leave a Comment