उटी ठरत आहे पर्यटकांसाठी आकर्षण

ooty

अमाप असे निसर्ग सौंदर्य, चहुबाजूंनी दाटलेली हिरवळ, देवदार वृक्षाने सजलेली वनराई यामुळे उटीच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भरच पडत आहे. तामिळनाडूतील थंड हवेचे ठिकाण म्हणून उटीची गणना केली जाते. येथील तापमान वर्षभर ५ ते २५ अंश इतकेच असते. त्यामुळे उन्हाळ्यात पर्यटकांचा ओढा उटीकडे जादा असतो.

उटीमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक म्हणजे येथील बॉटनिकल गार्डनची स्थापना १८२५ साली तत्कालीन जिल्हाधिकारी जॉन सुलीवन यांनी केली. या गार्डनमध्ये सौंदर्यासह बोटिंग, घोडेस्वारी हे प्रमुख आकर्षण आहे. उटी हे शहर निलगिरी पर्वतरांगेत सुमारे ७ हजार ३५० फूट उंचीवर वसले आहे. त्यामुळे याठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद पर्यटकांना खर्‍या अर्थाने लुटता येतो.      

येथील चिलून पार्क ही लहान मुलांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याठिकाणचे झोके व छोटे-छोटे डब्बे असलेली रेल्वे सर्वांचे लक्ष वेधून घेते. येथील रोझ गार्डनमध्ये १० एकर परिसरात विविध रंगांच्या गुलाबाची लागवड करण्यात आली आहे. हे सुंदर गुलाब पाहून या गार्डनच्या बाहेर पडायला नको वाटते. त्यासोबतच उटी म्युझियम संहालयाची १९८९ मध्ये निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आदिवासींनी तयार केलेल्या वस्तू व कपडे यांचा संग्रह पाहण्यासारखा आहे. चेटींग क्रास हे चहासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. येथे बाहेरून आलेले पर्यटक येथील चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय बाहेर पडत नाहीत. उटीचे सौंदर्य पाहण्यासाठी याठिकाणी भारतीय पर्यटकासोबत मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक हजेरी लावतात. येथील हॉटेलिंगची व्यवस्था चांगली आहे.

Leave a Comment