अरब समुहातील कतार हा देश सध्या अनेक कारणांनी चर्चेत असला व अनेक अरब देशांनी त्याच्या बरोबरचे संबंध तोडले असले तरी २१ व्या शतकातील हायटेक शहर पाहायचे असेल तर कतार वारी करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. या देशात २०२२ च्या फिफा वर्ल्ड कप सामन्याचा अंतिम सामना होणार आहे व त्यासाठी लुसेल शहराला हायटेक बनविले जात आहे. हे काम २०१९ सालापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. या उभारणीसाठी २७०० अब्ज रूपये खर्च केले जाणार आहेत.
२१ व्या शतकातले हायटेक शहर लुसेल
हे शहर ३८ चौरस किलोमीटरच्या परिसरात वसवले जात असून त्याचा कांही भाग समुद्रावर तर कांही वाळवंटात असणार आहे. या हायटेक शहरात स्टेडियम बरोबरच शॉपिंग कॉम्प्लेक्स, रहिवासी इमारती, बेटे, प्राणीसंग्रहालय, गोल्फ कोर्स आदि सर्व सुविधा अत्याधुनिक असतील. येथे इलेक्ट्रीक उपकरणे, ट्रॅफिक सिग्नल काँम्प्युटराईज केलेले असतीलच पण पर्यटकांसाठी लाईट ट्रेन, वॉटर टॅक्सी, फक्त पायी चालण्याची आवड असलेल्यांना अंडरग्राऊंड पॅसेज बांधले जात आहेत. वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असेल तर ट्रॅफिक आपोआप डायव्हर्ट होऊ शकणार आहे. सुरक्षेसाठी कोपर्याकोपर्यात कॅमेरे बसविले जाणार असून येथील इमारतीही वैशिष्ठ्यपूर्ण असतील. चंद्राच्या आकारात बांधलेले सुंदर हॉटेल येथे आहे. उर्जेसाठी सोलर पॅनलचा वापर केला जाणार आहे.