वनप्लस या मोबाईल उत्पादक कंपनीने मोबाईलप्रेमींसाठी एक ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. भारतात वनप्लस कंपनीला १००० दिवस पूर्ण होण्याच्या निमित्ताने कंपनीकडून एका खास सेलचे आयोजन करण्यात आले आहे. ‘OnePlus 1000 Days’ या ऑफरमध्ये कंपनीने ग्राहकांसाठी खास ४००० रुपयांची सूट दिली आहे.
तब्बल ४,००० रुपयांनी स्वस्त झाला वनप्लस
ग्राहकांना वनप्लस ३टी या स्मार्टफोनच्या खरेदीवर ४००० रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे. ही ऑफर ५ सप्टेंबर २०१७ ते ७ सप्टेंबर २०१७ दरम्यान सुरु राहील. वनप्लस ३टी या फोनची किंमत २९,९९९ रुपये आहे. पण कंपनीतर्फे ४००० रुपयांची सूट मिळत असल्याने हा फोन २५,९९९ रुपयांत मिळणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांनी कॅश डिस्काऊंटसोबतच इतरही ऑफर्सचा फायदा घेता येणार आहे.
हा फोन अॅक्सिस बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्यास २००० रुपयांपर्यंत कॅशबॅक ग्राहकांना मिळेल. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास २००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. त्याचबरोबर हा फोन तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्याज न भरता हफ्त्यांवर देखील खरेदी करु शकता.