जगातली सर्वात धाकड एसयूव्ही मॅराडेर


कोणत्याही नव्या अत्याधुनिक कारसंबधी ती किती पॉवरफुल आहे याचे कांही निकष आहेत. त्यानुसार कोणतीही कार ० ते १०० किमीचा वेग किती सेकंदात घेते यावर तिची इंजिन पॉवर जोखली जाते. अपघात झाल्यावरही जिचे फारसे नुकसान होत नाही ती मजबूत मानली जाते. मात्र चालता ट्रकही विरूद्ध बाजूने खेचू शकणारी, वेळ पडल्यास ताशी ७०० किमीचा वेग पकडू शकणारी व छोटे मिसाईल अथवा बाँबहल्ला सहज पेलू शकते अशी जगातील सर्वात धाकड एसयूव्ही ब्रिटनच्या ऑटोमोबिल प्रोग्रॅम टॉप गियरमध्ये दाखविली गेली आहे. तिचे नांव आहे मॅराडेर

ही कार नवी नाही. २०११ मध्ये ती फक्त लष्करासाठी तयार केली गेली होती. नुकत्याच झालेल्या प्रोग्रॅममध्ये ती नागरी वापरासाठीही कशी योग्य आहे हे दिसून आले व पाहतापाहता तिची लोकप्रियता वाढू लागली आहे. या एसयूव्हीची हमर कारशी तुलना केली गेली तेव्हा ही कार अधिक सरस ठरली. द.अफ्रिकेतील पॅरामाऊंट ग्रुपने डिफेन्स क्षेत्रासाठी ती तयार केली होती. २००७ च्या आंतरराष्ट्रीय डिफेन्स प्रदर्शनात ती सादर केली गेली होती. या गाडीचा नेहमीचा स्पीड १०० ते १२० आहे मात्र वेळ पडल्यास ती ताशी ७०० किमी वेगाने धावू शकते.

हिचे वजन १३ टन आहे. त्यामुळे तिची एक्स्ट्रीम टॉप टेन एसयूव्ही मध्ये गणना केली गेली आहे. काँक्रीटची भिंत ती तोडू शकते तसेच पहाड व दलदलीतही उत्तम प्रकारे चालू शकते. टँक माईन प्रोटेक्शन असल्याने ती बाँब हल्ला अथवा स्फोटात सापडली तरी तिचे फारसे नुकसान होत नाही. रस्त्यावर कार्सचा ताफा उभा करून तिची टेस्ट घेतली गेली तेव्हा ती समोरची कार क्रॅश करून तिच्यावरून पुढे धावल्याचे पाहायला मिळाले आहे.

Leave a Comment