गोवा ठरणार आता सर्वच मौसमात रमणीय

गोवा हे नाव ऐकल्यानंतर मनाला एक आल्हाद होतो. तेथील समुद्राचा किनारा पाहण्यासाठी कोट्यावधी विदेशी  पर्यटक हजेरी लावतात. विशेषत: हिवाळा व उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या मोठी असते. पावसाळ्यात हे प्रमाण   हिवाळा व उन्हाळ्याच्या  तुलनेत थोडेसे  कमी असते. त्यामुळे आता मान्सून सीझन मध्येही गोव्याला पर्यटकाचा ओघ वाढावा यासाठी गोवा राज्य सरकारने नवीन मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता ‘अमुतन-मान्सून’ या नवीन मोहीमेमुळे पर्यटकाची संख्या तर वाढणारच आहे, शिवाय यामधून गोवा राज्य सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे.

ताण-तणाव दूर व्हावा, मन शांत व्हावे म्हणून गोव्यातील समुद्र किनार्‍याचा देश विदेशातील पर्यटक  सहारा घेतात. येथील सर्वच बीच नागरिकांनी सदैव ओसंडून वाहत असतात. हॉटेल व लॉजिंग सदैव फुल असते. त्यामुळे पर्यटकांना याठिकाणी जायचे असेल तर कित्येक दिवस अगोदरच बुकिंग करावे लागते. मात्र पावसाळ्यात स्थिती थोडीशी वेगळी असते. त्यामुळे गोव्याचे पर्यटन विकासमंत्री दिलीप परुळेकर यांनी गोव्यातील विकासाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे.

या प्लॅननुसार आता गोवा सर्वच मोसमात रमणीय होणार आहे. या विकास कार्यक्रमांतर्गत हिरवे जंगल व आणखी काही बीचची निर्मिती करण्यात येणार आहे.  ‘अमुतन मान्सून’ या मोहिमेअंतर्गत  सर्वांसाठी घरगुती पद्धतीच्या वातावरणाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातही आता गोव्यातील वातावरण पूर्वीच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक रमणीय होणार आहे.

Leave a Comment