आता वाघ उरले केवळ चित्रपटांपुरते

tiger2

नागपूर – जंगलामधील प्राण्यांचे, झाडांचे रक्षण करण्यावर भरपूर चर्चा होतात, पण कृती होत नाही. याचा दुष्परिणाम जंगलासोबत प्राण्यांनाही भोगावा लागतो. त्यामुळे वाघासारखा राष्ट्रीय प्राणी आता केवळ चित्रपटांपुरता मर्यादित राहिला आहे, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक देवाजी तोफा यांनी येथे व्यक्त केली. निर्झर फिल्म सोसायटीच्या वतीने आयोजित वसुंधरा आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सवात त्यांना वसुंधरा सन्मान प्रदान करण्यात आला. व्हीएनआयटीच्या सभागृहात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाच्या समारोप झाला. या सत्कार सोहळ्यात मुख्य वनसंरक्षक खेतरपाल, महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव, वाहतूक शाखेचे निवृत्त पोलिस उपायुक्त अरविद गिरी, पर्यावरणमंत्री विजय घुगे, समीर नाफडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
देवाजी तोफा म्हणाले की, आजपासून चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी आम्ही जंगलाशिवाय जगू शकत नव्हतो. अतिशय शांत आणि छान वातावरणात आम्ही जगत होतो. आता जंगलामध्ये माणसे वाढली आणि झाडे, प्राणी कमी झाले. वाघ तर एखादाच असेल. जंगल, पाणी आणि प्राणीदेखील सरकारी झाले आणि आदिवासी भिकारी झाले. आजही गावात अनेक लेक्चर होतात. आम्ही ऐकतो, पण काहीच कळत नाही. व्यवस्थापन  समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला ते कळत नाही. थेट कृती कळते. सारे नियम माहिती आहेत. वनहक्क असो वा कुठलीही समिती असो, जंगलाच्या व्यवस्थापनाकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे लोक जंगलापासून दूर झाले आहेत. वन व्यवस्थापनापूर्वी आम्ही मन व्यवस्थापन आणि जन व्यवस्थापन करण्याचे ठरवले. मन प्रदूषित आहे म्हणून ही वेळ आली आहे. आजवर कित्येक अधिकारी बदलले, पण गाव बदलले नाही. म्हणून वनांच्या संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविण्याचे ठरविले. जो वनांचे संरक्षण करेल त्याला थेट फायदा मिळायला हवा, अशी अटही घातली.
खेतरपाल म्हणाले की, महाराष्ट्रत ४१ टक्के परिसर जंगलांनी व्यापला आहे. त्यापैकी ८० टक्के जंगल शासनाच्या नाही, लोकांच्या ताब्यात आहे. त्यामुळे जंगलांचे संरक्षण कराल तर लोकांचेही होईल. जनजागृती करण्याच्या दृष्टीने असे महोत्सव खेड्यांमध्येही दाखवायला हवेत.

1 thought on “आता वाघ उरले केवळ चित्रपटांपुरते”

  1. virendra bhoite

    i really like design of your site.nice info about news and marathi article

Leave a Comment