
गोवा हे नाव ऐकल्यानंतर मनाला एक आल्हाद होतो. तेथील समुद्राचा किनारा पाहण्यासाठी कोट्यावधी विदेशी पर्यटक हजेरी लावतात. विशेषत: हिवाळा व उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या मोठी असते. पावसाळ्यात हे प्रमाण हिवाळा व उन्हाळ्याच्या तुलनेत थोडेसे कमी असते. त्यामुळे आता मान्सून सीझन मध्येही गोव्याला पर्यटकाचा ओघ वाढावा यासाठी गोवा राज्य सरकारने नवीन मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता ‘अमुतन-मान्सून’ या नवीन मोहीमेमुळे पर्यटकाची संख्या तर वाढणारच आहे, शिवाय यामधून गोवा राज्य सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे.