७३.५० रुपयांनी महागला विनाअनुदानित सिलेंडर


नवी दिल्ली : आजपासून विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ७३.५० रुपये तर अनुदानित सिलेंडरच्या दरात ७.२३ रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे सर्वसामन्यांच्या खिश्याला आता पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

प्रत्येक १५ दिवसाला इंधन दराचे पेट्रोलियम कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी या परीक्षण करत आहे. मागील महिन्यात १ जुलैला पेट्रोलियम कंपन्यांनी सिलेंडरच्या दरात ३२ रुपये कपात केली होती. देशात सध्या १८.११ कोटी अनुदानित सिलेंडराचा लाभ घेत आहे. तर २.६६ कोटी लोक विनाअनुदानित सिलेंडरचा वापर करत आहे.

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांच्याकडून महिन्यापूर्वी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभेमध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम कंपन्यांना प्रत्येक महिन्याला सिलेंडरच्या दरात ४ रुपये वाढ करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. आता पुढील वर्षी मार्चपर्यंत सिलेंडरवर अनुदान देणे बंद करण्यात येणार आहे.

Leave a Comment