भारतात प्रथमच दिसली मॅक्लारेन ७२० एस सुपरकार


पोर्शे, रोल्स रॉयस, फेरारीसारख्या सुपरकार भारतीय रस्त्यावर धावताना दिसणे ही आता नवलाची गोष्ट राहिलेली नाही. मात्र याच सिरीजमधील सुपरकार मॅक्लारेन ७२० एस भारतात प्रथमच दिसली असून बंगलोरच्या रंजीत सुंदरमूर्ती यांनी मेम्फीस रेड कलरची ही सुपरकार खरेदी केली आहे. जागतिक बाजारात तिची किंमत आहे २ लाख ८८हजार८४५ डॉलर्स. अर्थात प्रत्येक देशासाठी तिची किंमत वेगळी आहे. सुंदरमूर्ती यांच्याकडे फेरारी ४८८ जीटीबी व फेरारी ४५८ इटालिया या सुपरकारही आहेत.

या कारला ४.० लिटरचे व्ही एट टिवन टर्बोचार्ज इंजिन, सेव्हन स्पीड ड्युल क्लच गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती २.८ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३४१ किमी. लेफ्ट हँड ड्राईव्हची ही कार प्रथम जिनेव्हा ऑटो शोमध्ये सादर केली गेली होती. कारचे इंटिरियर अँबिएंट लायटिंग, कार्बन फायबर मटेरियल व लेदरचा कुशल वापर करून बनविले गेले आहे. या कारची सध्या जगभरात क्रेझ आहे.

Leave a Comment