जिओ फोनची डिलिव्हरी प्रथम पाच शहरात


उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शून्य किंमतीत उपलब्ध केलेल्या जिओ फोनसाठी देशभरातून लक्षावधी लोकांनी बुकींग केले असून या फोनची डिलिव्हरी प्रथम देशातील पाच शहरात केली जाणार असल्याचे समजते. दररोज १ लाख याप्रमाणे फोनचे वितरण केले जाणार आहे. यात सर्वप्रथम दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैद्राबाद, अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे.

या शहरातील डिलिव्हरी नंतर जिओ सेंटर व रिलायन्स जिओ स्टोअर्समध्ये हे फोन उपलब्ध केले जाणार आहेत असेही समजते. त्यानंतर रिटेलर्स कडे व डिलर्सकडे त्यांचा पुरवठा होणार आहे. या फोनसाठी २.४ इंची स्क्रिन, एफ एम रेडिओ, टॉर्चलाईट, ४ जीबी मेमरी, मायक्रोकार्डच्या सहाय्याने ती ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. त्यात जिओ चॅटसह अनेक अॅप प्रिइन्स्टॉल असतील. हे फोन तैवान मध्ये तयार केले जात असल्याचेही समजते.

Leave a Comment