शीतपेयांचा धोका

colddrinks>

स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी प्रमाणात गाऊट हा विकार होतो असे म्हटले जाते. या विकारात असह्य सांधेदुखीचा सामना करावा लागतो. पण स्त्रियांनी शीतपेये पिण्याचे प्रमाण वाढविल्याने त्यांच्यातही या विकाराचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. शीतपेयांमध्ये अधिक प्रमाणात असलेल्या फ्रुक्टोजमुळे हे घडते. गाऊटचे रुपांतर पुढे हृदयविकारातही होऊ शकते. अतिरिक्त फ्रुक्टोजमुळे रक्तातील युरीक एसीडचे प्रमाण वाढते. हे युरीक एसीड सांध्यांमध्ये जमा झाल्यास तेथे असह्य वेदना निर्माण होतात. विशेष म्हणजे स्त्रियांचे वय वाढत जाते तसे त्या या विकाराला अधिक संवेदनशील बनतात. मोनोपॉजपूर्वी स्त्रियांच्या शरीरात स्त्री-हार्मोनचे प्रमाण जास्त असते. या हार्मोनमुळे रक्तातील युरीक एसीडचे प्रमाण नियंत्रणात ठेवले जाते. पण मोनोपॉजमुळे या हार्मोनचे प्रमाण कमी होऊन स्त्रियांच्या रक्तातील युरीक एसीड वाढु लागते. साहजिकच त्या हृदयविकाराला अधिक प्रमाणात बळी पडु लागतात.

अमेरिकेतील काही शीतपेयांचे उत्पादक शीतपेयांना गोडवा आणण्यासाठी त्यात कॉर्न सिरप वापरतात. सुक्रोजमध्ये फ्रुक्टोज व ग्लुकोजचे प्रमाण ५०:५० असे असते तर कॉर्न सिरपमध्ये फ्रुक्टोज ग्लुकोजपेक्षा अधिक प्रमाणात आढळते. कोक, पेप्सीसारख्या लोकप्रिय शीतपेयांमध्ये तर ६५% इतके फ्रुक्टोज असते. शरीरात प्रवेश केल्यावर यकृतात या फ्रुक्टोजचे विघटन होऊन नविन चरबी तयार होण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते. यामुळे यकृतासही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शीतपेयांचा वापर टाळणेच अधिक योग्य ठरेल.              

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही