लवकरच सुपरमॅनप्रमाणे आकाशात उडू शकणार माणूस


सुपरमॅनप्रमाणे आपल्याला आकाशात विहार करता यावा अशी लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना इच्छा असते. ही इच्छा यूएईमधील रासअल खैमा पर्यटन विकास प्राधिकरणाच्या प्रयत्नातून लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे. त्यासाठी टोरोचे सहाय्य घेतले जात असून डिसेंबर २०१७ पर्यंत यासाठी आवश्यक असलेल्या झिपलाईन वायरची निर्मिती केली जात आहे. या वायरच्या सहाय्याने माणसाला आकाशात खूप उंचापर्यंत भरारी मारता येईल व वाळवंटाचे सौदर्य आकाशातून अनुभवता येईल.

पर्यटन प्राधिकरणने दिलेल्या माहितीनुसार डमबॅल पर्वतावर जगातील सर्वात मोठी झिप लाईन उभारली जात आहे. तिच्या सहाय्याने समुद्रसपाटीपासून १९३४ मीटर उंचावरून माणूस आकाशात उडू शकणार आहे. या उडण्याचा वेग ताशी ५० मीटर ते ८० मीटर पर्यंत असेल. ही वायर उभारण्यासाठी २८ फुटबॉल मैदानांइतकी जागा तयार केली गेली आहे. साहसी लोक या सुविधेचा फायदा घेताना स्वतःचे डोळे उघडे ठेवूनही उड्डाण करू शकतील. अर्थात उड्डाणाचा कालावधी संपल्यावर त्यांना दुसरीकडे उतरविले जाणार आहे व तेथून फुटांवरून उतरून त्यांना खाली मैदानान यावे लागणार आहे.

या वायरमध्ये ७ टनी केबलच्या दोन लाईन आहेत. त्यातून आपल्या कुटुंबासह अथवा मित्रांसमेवत उड्डाणाचा आनंदही इच्छुक लुटू शकणार आहेत.

Leave a Comment