नोदाबंदीनंतर जमा झालेल्या नोटांची आकडेवारी जाहीर


९९ टक्के जुन्या नोटा बँकेत परत आल्या; एकुण सोळा हजार कोटी रूपये परत आले नाही
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या वर्षी पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा बंद केल्या होत्या. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अहवाल दिला आहे. नोदाबंदीनंतर किती पैसा बॅंक व्यवस्थेत जमा झाला आहे, याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पाचशे आणि एक हजारांच्या जुन्या नोटा ९९ टक्के बॅक व्यवस्थेत जमा झाल्या आहेत.

आरबीआयने वार्षिक आर्थिक अहवालात ही माहिती दिली आहे. या अहवालात मार्च 2017 पर्यंतची आकडेवारी देण्यात आली आहे. एक हजार रूपयांच्या नव्वद टक्के नोटा बॅंकेत पुन्हा जमा झाल्या आहेत. नोटाबंदीपूर्वी चलनात असलेल्या 15.44 लाख कोटी रूपयांपैकी 15.28 लाख कोटी रूपये बॅंकेत जमा झाले आहेत.

अर्थ मंत्री अरूण जेटली यांनी सांगितले की रोख व्यवहार न करता डिजिटल व्यवहार करून भारतीय अर्थव्यवस्था मजूबूत करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली होती. पण अजूनही नागरिक रोख व्यवहार करीत आहेत. देशातील शंभर व्यवहारात फक्त दहा व्यवहार हे डिजिटल पद्धतीने होत आहे. पण अन्य नव्वद व्यवहार हे रोख स्वरूपातच होत आहे. नोटाबंदीचा मुख्य उद्देश हा रोख रक्कम जमा करण्यापेक्षा डिजिटलाजेशनकडे जाण्याचा आहे. आरबीआयच्या अहवालानुसार देशात रोख व्यवहार सतरा टक्क्यांनी कमी झाले आहेत.

आरबीआयच्या अहवालानुसार एक हजार रूपयांच्या जवळपास 99 टक्के नोटा परत आल्या आहेत. तर एक हजारांच्या नोटांमध्ये केवळ 8.9 कोटी नोटा बॅंकेत परत आल्या नाही. पाचशे रूपयांच्या जून्या नोटांमध्ये 7 हजार 100 कोटी रूपये परत आले नाही. उर्वरीत नोटा बनावट आणि फाटलेल्या होत्या. एकुण 16 हजार कोटी रूपये परत आले नाही. 2016-17 या वर्षात नोटा छपाईचा खर्च 7 हजार 965 कोटी रुपये झाला असल्याचे आरबीआयने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

Leave a Comment