पिझ्झा डिलिव्हरी देणार सेल्फ ड्रायव्हिंग कार


डेट्रॅईटच्या मोटर उत्पादक कंपनी फोर्डने व डोमिनोज पिझाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. यात पिझा प्रेमींना पिझ्झाची डिलिव्हरी सेल्फ ड्रायव्हिंग कार करणार आहे. याच्या चाचण्या सध्या मिशिगन राज्यातील आन अर्बर शहरात सुरू आहेत. दीड महिना या चाचण्या सुरू राहणार असून त्यासाठी फोर्डने सेल्फ ड्रायव्हिग कार तयार केली आहे. ही कार कॅमेरा, सेन्सर व रडार युक्त आहे.

अर्थात फोर्डया या कारला सध्या मनाप्रमाणे जाता येत नसल्याचे समजते. म्हणजे सध्यातरी या कारचे नियंत्रण काचेमागून एक इंजिनिअर करतो आहे तर दुसरा तिच्या हार्डवेअरवर देखरेख करतो आहे. ऑस्ट्रेलियन डोमिनोज पिझ्याने पूर्वी न्यूझीलंडमध्ये ड्रोनमार्फत तसेच सेल्फ ड्रायव्हिंग रोबोतर्फे पिझा डिलिव्हरी देण्याच्या चाचण्या केल्या आहेत.फोर्डचे उपाध्यक्ष शेरीफ मारकबाई या संदर्भात म्हणाले की सेल्फ ड्रायव्हिंग कारमधून पिझा डिलिव्हरी देण्यामागे कंपनीचा उद्देश ग्राहकांना स्मार्ट वातावरणात स्मार्ट वाहनाचा उपयोग करून त्यांच्या जीवनाचा स्तर अधिक चांगला बनविणे हा आहे.

Leave a Comment