पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया

passport

भारतीय नागरिकांना भारतीय पारपत्र (पासपोर्ट) देण्याची जबाबदारी विदेश मंत्रालयाच्या पासपोर्ट व व्हिसा वकीलात विभागाकडुन (CPV) पार पाडली जाते. देशभरातील तीस ठिकाणांहुन आणि विदेशातील १६३ भारतीय केंद्रांमधुन भारतीय नागरिकांना पारपत्र प्रदान केले जाते.

पारपत्र देण्यासंबंधीची सगळी माहिती http://india.gov.in/outerwin.php?id=https://passport.gov.in येथुन प्राप्त करता येते. भारतात असलेल्या सगळ्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये ऑनलाईन स्थिती चौकशी सेवा पुरविली जाते. येथे, पावतीवर असलेला फाईल संदर्भ क्रमांक दिल्यास, आपण पासपोर्ट अर्जाची स्थिती तपासु शकतो. अर्जदाराच्या काही तक्रारी असल्यास, त्या ऑनलाईन दाखल करण्याच्या सुविधेचाही लाभ घेता येतो.
पासपोर्टसाठी अर्ज कसा करावा :

नविन पारपत्रासाठी अर्ज करताना, पारपत्र पुन्हा एकदा मिळविण्यासाठी किंवा हरविलेल्या आणि खराब झालेल्या पारपत्राऐवजी दुसरे पारपत्र मिळविण्याचा अर्ज करताना, संबंधीत पारपत्र निवेदन, पत्र कोणत्याही पारपत्र केंद्रातुन किंवा नियोजीत स्पीडपोस्ट केंद्रातुन किंवा तुमच्या शहरातील कोणत्याही नियोजीत ठिकाणावरून घेता येते. http://india.gov.in/outerwin.php?id=http://passport.gov.in/cpv/forms.htm येथे क्लीक करूनही पारपत्र आवेदन पत्र डाऊनलोड करता येते.

अर्ज दाखल करण्याच्या सविस्तर पात्रता व सुचनांसाठी येथे क्लीक करा : http://india.gov.in/outerwin.php?id=http://passport.gov.in/cpv/instructions.htm काळजीपुर्वक भरलेल्या आवेदनपत्रासोबत निवासाचा दाखला, जन्मतारखेचा दाखला, व्यक्तिगत विशिष्ट तपशील (लागु असल्यास) ना हरकत प्रमाणपत्र (शासनाच्या सार्वजनीक विभागातील वेतनधारकांसाठी), आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक दस्तऐवज खालीलपैकी एखाद्या ठिकाणी सादर करावा. अर्जदार सध्या ज्या कार्यक्षेत्रात निवास करत आहे, त्यानुसार हे ठरविले जाते. हि स्थळे अशी आहेत :

१) पारपत्र कार्यालयाच्या काउंटरवर.

२) स्पीडपोस्ट केंद्रांवर.

३) जिल्हा पारपत्र केंद्रांवर.

४) पारपत्र संग्रह केंद्रांवर. 

6 thoughts on “पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया”

  1. मला तात्काळ पासपोट चार दिवसात मिळवण्या साटी काय करावे लागेल ते कळवावे.

  2.  मला तात्काळ पासपोट चार दिवसात मिळवण्या साटी काय करावे लागेल ते कळवावे.

  3. dinesh d. golatkar.

    मी श्री दिनेश द. गोलतकर.

             मला तात्काळ पासपोट चार दिवसात मिळवण्या साटी काय करावे लागेल ते कळवावे.

     

                                                                                                                                                   आपला विस्वासू

                                                                                                                                                दिनेश द.  गोलतकर                

Leave a Comment