क्रीडा वैद्यकी

खेळाडू ही देशाची संपत्ती. त्यामुळे त्यांचा खेळ हे देशाचे वैभव. ती संपत्ती नीट जतन करणे आणि देशाचे वैभव वाढवणे हे काही एकट्याचे काम नाही. खेळाडूंच्या प्रशिक्षकापासून त्यांच्या केअर टेकरपर्यंत सर्वांनाच काम करावे लागते. विशेषत: खेळाडू फिट रहावेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. सध्या भारताचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतला सहभाग वाढत चालला आहे म्हणून एकेका खेळाडूंच्या दुरुस्तीला राष्ट्रीय महत्व आले असून, वैद्यकीय शाखेत स्पोर्टस् मेडिसीन हा नवा विभाग विकसित होत आहे.

सध्या स्पोर्टस् मेडिसीन या करीयरची चर्चा होत आहे. या प्रकारात ज्यांची खिदमत करायची असते ते तरुण असतात. तेव्हा एखाद्या छोट्याशा जखमेमुळे त्यांचे पूर्ण करीयर मारले जाऊ शकते. मात्र त्यांच्या विशिष्ट जखमांचा खास अभ्यास करून त्यावर विशेष उपचार केले, तर त्या खेळाडूंची करीयर घडू शकते. तसा विचार केला तर खेळाडूच्या अगदी किरकोळ दुखण्यामुळे तो त्याच्या स्पर्धेत सेकंदाचा शंभरावा हिस्सा एवढा जरी मागे राहिला तरी त्याची संधी जाते. पर्यायाने देशाचे नुकसान होते. एकेका खेळाडूवर लक्षावधी रुपये खर्च झालेले असतात. पण स्नायूतल्या किंचित बिघाडामुळे किंवा मनगट थोडेसे पिचल्यामुळे सारे काही वाया जाण्याची शक्यता असते. याचा विचार केल्यास स्पोर्टस् मेडिसीनचे महत्व लक्षात येते.

एम.बी.बी.एस. झालेल्या डॉक्टरांना एम.एस. स्पोर्टस् मेडिसीनमध्ये स्पेशलायझेशन करता येते किंवा एक वर्षाचा स्पोर्टस् मेडिसीनचा पदव्युत्तर अभ्यास करता येतो. भारतात आता आता या शास्त्राचे महत्व वाढत चालले आहे. त्यामुळे हे अभ्यासक्रम भारतात नाहीत. पण भारतात उपलब्ध असलेला ऑर्थोपेडिक सर्जरीसारख्या अभ्यासक्रमांचे स्पोर्टस् मेडिसीनशी साम्य आहे. केवळ स्पोर्टस् मेडिसीन करायचे असेल तर परदेशी जावे लागेल.

Leave a Comment