अॅल्युमिनियम फॉईलचा असाही करा वापर


आजकाल विविध पदार्थ गरम राहावेत म्हणून अॅल्युमिनियम फॉईलमध्ये ते पदार्थ गुंडाळून ठेवले जातात हे आपण सर्रास पाहतो. घरातून सकाळच्या वेळी बाहेर पडताना घेतलेल्या डब्यातील पोळ्या, पराठे, पुर्‍यांसारखे पदार्थ या फॉईलमध्ये गुंडाळून नेले तर बराच काळ गरम राहतात. हॉटेलमध्येही अनेक पदार्थ पॅक करून घेतले तर त्यासाठी ही फॉईल वापरली जाते. अनेकदा ओव्हन मध्ये अथवा मायक्रोव्हेव मध्ये पदार्थ तयार करतानाही संबंधित भांड्याला वरून फॉईल गुंडाळली जाते. या फॉईलचा वापर अन्य कारणांसाठीही करता येतो. कसे ते पाहू.


अॅल्युमिनियम फॉईलचे विघटन सहजी होत नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर कचरा कमी करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी या फॉईलचा वापर शकयतो कमी करावा. पदार्थांबरोबर गुंडाळून आलेली फॉईल एकदम टाकून न देता ती अन्य प्रकारे वापरता येते. उदाहरण द्यायचे तर बाथरूममधील अथवा अन्य ठिकाणीही आपण सोपकेसमध्ये ठेवलेला साबण बरेचदा पाण्याच्या संपर्कामुळे विरघळून लडबडीत होतो. अॅल्यमिनियम फॉईलचा छोटासा तुकडा साबणाला लावून मग तो सोपकेसमथ्ये ठेवला तर साबण विरघळ्याची क्रिया कमी होते.


एखाद्या बाउलला ही फॉईल आतून लावावी व त्यात गार पाणी भरून दोन चमचे मीठ टाकावे. या पाण्यात चांदीच्या वस्तू बुडवून ठेवाव्या.थोड्या वेळाने थोड्या घासल्या तरी वस्तू चकचकीत होतात.. तसेच नॉनस्टीक कुकवेअर स्क्रबरने घासली तर ती खराब होतात. ही कुकवेअर अॅल्युनिमियम फॉईलने पुसली तर स्वच्छ होतात.


अनेकदा कात्रीची धार कमी होते. अशावेळी वापरलेली अॅल्युनिनियम फॉईल एकावर एक घड्या घालून घडी करावी व ही घडी कात्रीने कापण्याचा प्रयत्न करावा. कात्रीला पुन्हा धार येते. नळाच्या तोट्या, शॉवर हेड या फॉईलने घासली तर स्वच्छ होतात त्याबरोबर थोडा डिटर्जंट वापरला तर ही स्वच्छता आणखी सोपी होते.


अनेकदा आपण ओव्हनमध्ये अथवा पॅनमध्ये नॉनव्हेज पदार्थ गरम करत असू तर ओव्हनमध्ये फॉईल ठेवून त्यावर गरम करावा. तयामुळे पॅन अथवा ओव्हन तेलकट किवा खराब होणार नाही. ग्रीलवर पदार्थ बनविताना अनेकदा त्याचे तुकडे ग्रीलमध्ये अडकतात. ग्रील स्वच्छ करताना अॅल्युमिनियम फॉईलचा वापर केला तर तो स्क्रबरचे काम करतो. एखादी वस्तू गंज लागलेली असेल तर फॉईलचा गोळा बनवून घासल्यास गंज निघतो. तसेच घरातील फर्निचरमधील खुर्चा, बेड, सोफे यांच्या पायाखाली फॉईलचा तुकडा ठेवावा. या वस्तू दुसरीकडे हलवायची वेळ आली तर स्क्रॅच येत नाहीत.

Leave a Comment