टिपणे म्हणजे काय ?
एखादे जंगल आपल्याला मुठीत धरून आणता येईल का संपूर्ण जंगल मुठीत आणता येणार नाही, पण त्या जंगलाचा सारांश एका मुठीत आणता येईल. प्रमुख व महत्वाच्या वनस्पतींच्या फांद्या आणल्या, तरी सार्या जंगलांचा सारांश आणल्यासारखे होईल.
‘टिपण’ हा शब्द जन्मपत्रिकेबाबतही वापरला जातो. जन्मकुंडलीचा छोटासा कागद गृहमंडळाचा प्रचंड मोठा व्याप दाखवत असतो. वाळूत पडलेल्या धान्याचे दाणे कोंबडी अचूक ‘टिपत’ असते. अर्जूनाला धनुर्विद्या परीक्षेत झाडावरील पक्षाचा नेमका डोळा दिसला.
‘टिपणे काढणे’ या मध्ये नेमकेपणाच्या निरीक्षणाला विशेष महत्व आहे. असा नेमकेपणा टिपण्याची वेळ अभ्यासाखेरीज अन्य क्षेत्रातही येत असते. त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची तयारी मात्र हवी.