
खेळाडू ही देशाची संपत्ती. त्यामुळे त्यांचा खेळ हे देशाचे वैभव. ती संपत्ती नीट जतन करणे आणि देशाचे वैभव वाढवणे हे काही एकट्याचे काम नाही. खेळाडूंच्या प्रशिक्षकापासून त्यांच्या केअर टेकरपर्यंत सर्वांनाच काम करावे लागते. विशेषत: खेळाडू फिट रहावेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. सध्या भारताचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतला सहभाग वाढत चालला आहे म्हणून एकेका खेळाडूंच्या दुरुस्तीला राष्ट्रीय महत्व आले असून, वैद्यकीय शाखेत स्पोर्टस् मेडिसीन हा नवा विभाग विकसित होत आहे.