अभ्यासाच्या पद्धती म्हणजे काय ?

study

    जगातील आघाडीच्या देशांच्या यशाचे रहस्य त्यांच्या देशातील शिक्षणपद्धतीतील अभ्यासाच्या पद्धतीत दडले आहे. ब्रिटन, अमेरिका, जपान, जर्मनी,  फ्रान्स या देशांत साधारणपणे नव्वद टक्के निकाल लागतात. याचे कारण तेथे अभ्यास पद्धती तेथील अभ्यासक्रमाचा भागच असतात. आपल्याकडे अभ्यासपद्धती वापरणारांचे प्रमाण फक्त पाच टक्के असते. हे प्रमाण जर आपण शंभर टक्क्यावर नेले, तर येथील तरुणांच्या अभ्यासाच्या पद्धतीत क्रांती होईल. सार्‍या अभ्यास पद्धती सोप्या आहेत. पण ते कटाक्षाने कराव्या लागतात. दुसरे म्हणजे आपल्याकडे अभ्यासातील मुद्दे लक्षात ठेवणे याला महत्व आहे. पाठांतर हीच एक महत्वाची अभ्यासपद्धती आहे. त्यावर ज्यांना भर द्यायचा असेल त्यांच्यासाठी स्वतंत्र लेखमाला सुरु करणार आहोत. आपण विसरतो का व अभ्यासाचे विषय कसे लक्षात ठेवायचे. यावर त्या लेखात भर दिलेला असेल. यापूर्वीही काही अभ्यासपद्धती दिल्या आहेत. पुढील दोन महिने हे उन्हाळ्याच्या सुटीचे दिवस आहेत. त्यामुळे मुलांनी या विषयांचे केवळ वाचन करावे, लवकरच काही सुटीचे विषयही देण्यात येणार आहेत.
अभ्यासाची आवड निवड
    अभ्यासात आनंद वाटत नसेल तर तो अभ्यास खोटा असतो. त्याचे आपण वर्गातीलच उदाहरण घेउ ना ‘उद्या शाळेला सुटी आहे’ अशी नोटीस वर्ग सुरू असताना आली तर वर्गात आनंदाचे चित्कार उडतात. सुटटीच्या दिवशी सिनेमा व गप्पा याचीच चर्चा होते.
    अभ्यास म्हणजे  दु:ख व सुटटी म्हणजे आनंद असे समीकरण आपल्या मनात पक्के बसले असेल तर अभ्यास होणार कसा,  अभ्यासाबद्दल एवढी प्रचंड अप्रिती वाटत असेल तर अभ्यास करण्याची आवश्यकताही कळलेली नाही व जरी कळलेली असली तरी अभ्यासाची पद्धतच आत्मसात झालेली नाही.
    अतिश्रमानंतर विश्रांती म्हणून अभ्यास बाजूला ठेवणे निराळे व अभ्यासाबद्दल तिटकारा वाटत असेल तर सर्व प्रथम आपल्याच्यापद्धती तपासून पाहा.
    अभ्यासाचे ठोकताळे आपण डोक्यात बसविले आहेत आणि ते समजत नाहीत अशी अवस्था नाहीना, अभ्यास आवडत नसेल तर असे चुकीचे आडाखे डोक्यात बसले आहेत असे समजा म्हणून अभ्यासाचे छोटे छोटे तक्ते करून ते पचवा.
    आजारी माणसाला पक्वान आवडत नाही आणि खाल्ले तर पचत नाही. अशीच आपली अभ्यासाबद्दल स्थिती नाहीना, अशा वेळी आजार्‍याला प्रथम औषध व नंतर हलके फुलके अन्न देतात. आणि अभ्यासासाठी ती पद्दत स्विकारली तर अभ्यासाची प्रकृती कायम सुधारेल.