मोदी सरकारने आम नागरिकांसाठी दोन वर्षापूर्वी लागू केलेल्या अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणार्या ग्राहकांची संख्या ६२ लाखांवर गेली असल्याचे बुधवारी संबंधित अधिकार्यांनी जाहीर केले. पेन्शन फंड रेग्युलेटरी अॅन्ड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ने बॅकेतील व्याजदर कमी होत असल्याने भविष्यात हे ग्राहक ज्येष्ठ होतील तेव्हा त्यांना हमखास चांगला परतावा देणारी ही योजना लागू केली होती.
अटल पेन्शन योजनेत ग्राहक संख्या ६२ लाखांवर
या योजनेअंतर्गत स्टेट बँकेत ५१ हजार, कॅनरा बँकेत ३२ हजाराहून अधिक, आंध्र बँकेत २९०५७ खाती उघडली गेली असून डिसेंबर २०१६ पर्यंत या योजनेत ३९ लाख ग्राहक सहभागी झाले होते. यात १८ ते ४० या वयोगटातील नागरिक सहभागी होऊ शकतात मात्र त्यासाठी कांही अटी आहेत. आयकर न भरणारे, इपीएफ, इपीएस अकौंट नसणारे नागरिकच त्यासाठी पात्र धरले जातात. ६० व्या वर्षीपासून पेन्शन सुरू होते. यात आपल्याला जमेल त्या प्रमाणे दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. संबंधित रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात ऑटोमेटिक डिडक्ट होते.. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या जीवनसाथीला हा लाभ मिळतो व दोघेही मृत असतील तर दरमहा १ हजार पेन्शन मिळण्यासाठी गुंतवणूक केलेल्या ग्राहकाच्या वारसाला १ ते ७ लाख रूपयांची रक्कम एकरकमी मिळते असे समजते.