…अन् ओस पडला राजाचा ‘दरबार’


मुंबई : दरवर्षी नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविक याची ना त्याची ओळख काढतात आणि राजाचे दर्शन घेतात. याच दरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांची तुफान असते. तासंतास रांगेत उभे राहून लाखो भाविक राजाचे दर्शन घेतात. पण यावेळी जर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. काल मुंबईत झालेल्या धुंवादार पावसामुळे राजाचा दरबार गणेशभक्ताअभावी ओस पडला होता.

सेलिब्रिटी असो, राजकीय पक्षांचे प्रमुख असो, सगळेच गणेशभक्त गणेशोत्सवात शान कुणाची लालबागच्या राजाची…, लालबागच्या राजाचा विजय असो…असे म्हणत राजाच्या दरबारात हजेरी लावतात. पण, काल मुंबईतील १२ वर्षांत न झालेल्या विक्रमी पावसामुळे राजाचा दरबार ओस पडला होता. राजाचे दर्शन घेण्यासाठी आतूर असलेला गणेशभक्त पावसात पुरता अडकला. त्याचबरोबर परळ भागात पाणी साचल्यामुळे राजाच्या दरबाराकडे येणारे रस्तेही बंद झाले होते. त्यामुळे राजाच्या दरबाराकडे गणेशभक्तांचा ओस पडला. नेहमी गर्दीने घेरला जाणारा राजाचा दरबार काल मात्र मोजक्याच गणेशभक्तांनी भरलेला होता. यात विशेष म्हणजे लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांना लवकर आणि सहज होत नाही. पण गर्दी नसल्यामुळे हजर असलेल्या गणेशभक्तांनी अगदी आरामात दर्शन घेतले.

Leave a Comment