अायुष्यात 45 ते 55 या वयोगटातील माणसं सर्वात कमी आनंदी
आयुष्यात माणसं साधारण 16 ते 20 आणि 65 ते 85 या वयात सर्वात जास्त आनंदी असतात. तर 45 ते 55 या वयोगटातील माणसं सर्वात कमी आनंदी असतात. आनंदाचे हे क्षण 21 ते 55 या वयोगटात कमी होत जातात, असा निष्कर्ष अमेरिकेतील नॅशनल ब्युरो ऑफ इकोनॉमिक रिसर्चने काढला आहे.
सोळा ते वीस वयोगटात मिळतो सर्वात जास्त आनंद…..
97 देशांतील 13 लाख नागरिकांवर केलेल्या विविध सात चाचण्यांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यात भारतातील नागरिकांचाही समावेश आहे. ही पाहणी डेविड जी बलैंचफ्लॉवर आणि एंड्रू ओसवॉल्ड यांनी केली आहे. ते म्हणतात की आयुष्यात आनंद हा क्षणभंगुर असतो. आपण 16 व्या 80 व्या वर्षी सर्वात जास्त आनंदी असतो. 50 व्या वर्षात या आनंदाची पातळीही सर्वात खालच्या स्तरावर असते.
दहा गोष्टी ज्या आपल्याला आनंदापासून दर ठेवतात
1) स्वतःची तुलना इतरांशी करणे. 2) अपेक्षेप्रमाणे वस्तू नसणे 3) काय होणार याची काळजी 4) सध्या सुरू असलेल्या ट्रेंडशी आपली तुलना करणे 5) चांगल्या गोष्टीबाबत अनुमान लावणे 6) भूतकाळ आणि भविष्यकाळाक रमणे 7) आपल्यातील नाविन्याची ओळख 8) स्वतःच्या कामांची तुलना करणे 9) सुविधांचे आकलन करणे 10) रोज करीत असलेल्या कामांचे मुल्यमापन करणे
45 ते 55 या वयोगटातील माणसे ही सर्वात जास्त तणावग्रस्त असतात. कारण या काळात कुंटुबाची जबाबदारी, मुलांचे शिक्षण, स्वतःची नोकरी, स्वतःला वेळ न देणे आदी कारणांमुळे या वयोगटातील माणसं चितेंत असतात. तर 16 ते 20 या वयोगटातील तरूणाई सर्वात जास्त आनंदी असते, कारण या वयात त्यांच्यावर कुठलीही जबाबदारी नसते. ते चिंतेपासून मुक्त असतात. ते स्वच्छंदी आयुष्य जगतात. असेच 65 वर्षानंतर आनंदाचे क्षण पुन्हा येतात. या वयोगटातील माणसं सर्व जबाबदारीतून मुक्त झालेली असतात. त्यामुळे ते जास्त आनंदी असतात. आयुष्यातील आनंदाचा आलेख हा यु आकारचा असतो, जसा स्माईलीचा आकार असतो.