बीएसएनएल ग्रामीण भागात २५ हजार हॉटस्पॉट निर्माण करणार


नवी दिल्ली – पुढील दोन वर्षांत देशभरात १ लाख वाय-वाफ हॉटस्पॉट निर्माण करण्याच्या तयारीत देशातील सार्वजनिक टेलिकॉम कंपनी बीएसएनएल असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे.

श्रीवास्तव बीएसएनएलच्या ग्राहकांसाठी नव्या ‘जीएसटी अॅप’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मार्च २०१९ पर्यंत आम्ही देशभरात १ लाख वाय-फाय स्पॉट तयार करण्याची योजना आखली असून ग्रामीण भागासाठी यांपैकी २५ हजार हॉटस्पॉट असणार आहेत. युनिवर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) यासाठी आर्थिक सहकार्य करणार आहे.

Leave a Comment