हार्लेची अपग्रेडेड फॅट बॉब सादर


हार्ले डेव्हिडसनच्या २०१८ सॉफ्टटेल लाईनअपमधील नवी बाईक फॅट बॉबचे अपग्रेडेड व्हर्जन सादर करण्यात आले असून या बाईकचे डिझाईन क्रांतीकारी असल्याचे सांगितले जात आहे. लुक्स, बोल्ड अपील असलेली ही बाईक भारतात वर्षअखेर दाखल होईल असेही समजते. विशेष म्हणजे कंपनीच्या भारतातील गुरूग्राम फॅसिलीटी सेंटरमध्ये या तसेच याच बरोबर सादर होणार्‍या अन्य बाईक्सची असेंब्ली केली जाणार आहे.

या बाईकला दणकट १७४५ सीसीचे इंजिन दिले गेले आहे. आठ व्हॉल्व्ह मिलमाऊकी ८ ऑईल कूल्ड इंजिन, व्ही ट्वीन मोटर, ड्युल काऊंट बॅलन्सिंग मुळे चालकाला झटके बसत नाहीत तसेच चासीला अधिक मजबूती मिळते. सध्याच्या मॉडेलपेक्षा ही बाईक १० टक्के अधिक वेगवान आहे. रिडिझाईन करताना तिला स्टील ट्यूबलर फ्रे म दिल्याने ती थोडी हलकी झाली आहे.व ६५ टक्के जादा मजबूत झाली आहे. बाईकचे वजन ३०९ किलो असून तिची एक्स शो रूम किंमत आहे १३ लाख ५२ हजार रूपये.