जॅक मा नी सांगितले यशाचे गमक


अलिबाबा या जगातील नंबर वन ई कॉमर्स साईटचे सहसंस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या यशाचे गमक सांगितले आहे.एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पैसा, पॉवर व प्रसिद्धी पासून दूर राहणे हेच त्यांच्या यशामागचे कारण असल्याचे स्पष्ट केले.हाच आपल्या जीवनाचा मंत्र आहे असेही ते म्हणाले.

जॅक मा म्हणाले, पैसा असला तरी आपण अडचणीत येतो, पॉवरफुल असलो तरी संकटे संपत नाहीत आणि जादा प्रसिद्धी हे तर त्रासाचे मुख्य कारण असते. त्यामुळे पैसा असेल तर दुसर्‍यांच्या मदतीसाठी वापरा, पॉवर असेल तर दुसर्‍यांना वर काढण्यासाठी वापरा व प्रसिद्धी असेल तर ती अन्य लोकांबरोबर वाटून घ्या.चीनमधली सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असलेले जॅक मा त्यांच्या संपत्तीतील बरीचशी रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करतात आणि अनेक सामाजिक संस्थांचे ते सर्वात बडे डोनर आहेत.