जाणून घ्या Apple inc बद्दल काही…


Apple Inc. ह्या कंपनीच्या नावाला कोणत्याही प्रस्तावनेची गरज नाही. Apple Inc. ही जगातील सर्वात जास्त नावारूपाला आलेली आणि सर्वात धनवान कंपनी आहे. अमेरिकेच्या कोषागारात नसेल इतकी चलनी संपत्ती या कंपनीकडे आहे. आयफोन, आयपॅड, आणि मॅक पीसी हे प्रत्येक विज्ञानप्रेमी व्यक्तीचे आकर्षण आहे. या चाळीस वर्षे जुन्या कंपनी बद्दल आजही अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्यांना माहिती नाहीत. Apple ची उत्पादने , त्यांचे डिझायनिंग आणि कार्यक्षमता यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. Apple या ब्रॅन्डची ‘ आय ‘ उत्पादने , त्यांनी बाजारामध्ये सर्वप्रथम आणलेल्या ” आय मॅक ” पासून सुरु झाली. या कंपनीचे जनक आणि तत्कालीन सी इ ओ स्टीवी जॉब्स यांनी , Apple च्या ” आय ” उत्पादनांमधील ‘ आय ‘( i ) हा इंटरनेट साठी असल्याचे म्हटले . त्यानंतर या ” i ” पासून ‘individual ‘, म्हणजेच व्यक्तिविशेष, ‘ instruct ‘, म्हणजेच निर्देश, ‘ inform ‘, म्हणजे माहिती देणे, आणि ‘ inspire ‘, म्हणजे प्रेरणा , अशी चतुःसूत्री तयार करण्यात आली.

Apple चे अंदाजे ८०० मिलियन आयट्यून अकाउंट्स असून , यातील बहुतेक अकाउंट्स क्रेडिट कार्ड्स शी जोडली गेली असल्याने, Apple या कंपनी कडे जगातील सर्वात जास्त क्रेडिट कार्ड धारकांची खासगी माहिती असल्याचे सांगितले जाते. ही संख्या amazon वरून क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी करणाऱ्यांपेक्षाही जास्त आहे. Apple कंपनीच्या कुठल्याही कारखान्यांमध्ये किंवा त्यांना मालाचा पुरवठा करणाऱ्या कुठल्याही कारखान्यामध्ये जर बालकामगार काम करीत असल्याचे आढळून आले, तर Apple त्या बालकामगारांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेते. इतकेच नाही, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार देण्याची हमीही या बालकामगारांना दिली जाते. Apple च्या उत्पादनांमध्ये वापरली जाणारी पुष्कळशी यंत्रे अमेरिकेच्या बाहेरील प्रांतांमधून तयार होऊन येत असतात. अश्याच काही कारखान्यांमध्ये बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचे समजताच Apple ने या कारखान्यांविरुद्ध कारवाई करून. त्या बालकामगारांच्या पुनर्वसनाची जबाबदारी उचलली.

Apple च्या आयफोन ६ ची किंमत, त्याला तयार करायला लागलेल्या किमतीहून तीन पटीने जास्त आहे. Apple ला एक आयफोन ६ एस प्लस बनविण्यासाठी साधारण २३१. ५ डॉलर्स इतका खर्च येतो. पण बाजारामध्ये मात्र ह्या फोन ची किंमत ७४९ डॉलर्स इतकी आहे. Apple च्या उत्पादनांचे डिझायनिंग करणारे जॉनथन आईव्ह यांची खासगी प्रयोगशाळा असून ते आणि त्यांच्या टीम व्यतिरिक्त इतर कोणासही या प्रयोगशाळेत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. Apple च्या बाजारात येणाऱ्या भावी उत्पादनांची डिझाइन्स या प्रयोगशाळेमध्ये तयार केली जात असून, त्या बद्दल अतिशय गोपनीयता बाळगण्यात येते. या प्रयोगशाळेच्या आत काय सुरु आहे हे कोणासही कळू नये म्हणून त्तेथील खिडक्यांनाही काळ्या रंगाच्या काचा लावण्यात आल्या आहेत.

Leave a Comment