पाच हजारांनी स्वस्त झाला सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस


या वर्षाच्या मे महिन्यात सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे दोन्ही मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले होते. भारतीय ग्राहकांना यातील सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे मॉडेल ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. यातील ६ जीबी रॅमच्या व्हेरियंटची किंमत ७४,९०० रूपये ऐवढी होती. पण सॅमसंग कंपनीने एका महिन्यातच यात चार हजार रूपयांची सूट दिल्यामुळे हे मॉडेल ७०,९०० रूपयात मिळू लागले होते. तर आता या मॉडेलमध्ये पुन्हा एकदा पाच हजारांची सूट देण्यात आली असून अर्थातच हा स्मार्टफोन आता ६५,९०० रूपयात मिळणार आहे.

विशेष म्हणजे याच स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमचे व्हेरियंट फक्त एक हजारांनी कमी म्हणजे ६४,९०० रूपयात मिळत आहे. यामुळे फक्त एक हजार रूपये जास्त खर्च करून कुणीही हायर व्हेरियंट घेऊ शकतो. यामुळे ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्यदेखील कमी होण्याची शक्यता आहे. सॅमसंग कंपनी येत्या काही दिवसात अलीकडेच लाँच करण्यात आलेले सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. या पार्श्‍वभूमिवर सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये सूट देण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment