पाटणा रॅलीचा संदेश


भाजपाच्या विरोधात कोणीच ताकदीने उभे रहात नाही आणि जे कोणी उभे रहात आहेत ते आपापल्या राज्यात बलवान असलेले प्रादेशिक पक्ष आहेत. राष्ट्रीय पातळीवर भाजपाला कोणीच पर्याय देत नाही आणि कोणी देण्याचा प्रयत्न केलाच तर तसा तो करणार्‍या पक्षातले मतभेद अशा पर्यायाच्या आड येतील असे चित्र होते पण काल राजद पक्षाच्या पुढाकाराने निदान १२ पक्षांचे नेते भाजपा भगाओ नारा देऊन एकत्र आले. निदान पर्याय देण्याची कोशीश तरी जारी आहे असे चित्र निर्माण झाले. आगामी काळात या विरोधी एकीचे नेमके काय होईल हे सांगता येत नाही. पण अशा मेळाव्यांना दोन अथार्र्ंनी महत्त्व असते. पहिली म्हणजे त्याला झालेली गर्दी आणि दुसरी म्हणजे व्यासपीठावरील नेत्यांची उपस्थिती तसेच त्यांचे मनोबल.

या दोनपैकी गर्दीचे चित्र चांगले होते. अर्थात बिहारातच रॅली असल्याने तिचे आयोजक लालूप्रसाद यादव यांना ती जमा करणे सोपे होते. त्यांना नाही म्हटले तरी त्यांच्या यादव समाजात वेड्यासारखा पाठींबा आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपर्‍यातले हजारो लोक या रॅलीला हजर होते. ते भाषणांना चांगला प्रतिसादही देत होते. अशी प्रचंड गर्दी जमली की तिला गालबोट लागण्याचे प्रकार नाकारता येत नाहीत पण या मेळाव्यात असले गालबोट काही लागले नाही. पण नेत्यांनी मेळावा भाजपा भगावो असा असला तरीही भाषणे केली ती मात्र प्रामुख्याने नितीशकुमार यांच्या विरोधातली. त्यामुळे मेेळावा नेमका कोणाच्या विरोधात होता असा प्रश्‍न पडला. अर्थात लालूंच्या राजदला नितीशकुमार यांनीच सत्तेपासून वंचित केले असून ही जखम अजून ताजी आहे म्हणून टीकेचे लक्ष्य नितीशकुमार हे असणे साहजिक होते.

नेत्यांच्या उपस्थितीत मायावती आणि राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांची अनुपस्थिती जाणवली. कारण शेवटी कितीही मोठी जमवाजमव केली असली तरीही अशा जमवा जमवीत कॉंग्रेस हाच पक्ष प्रमुख असणार आहे. पण या पक्षाचे वरिष्ठ नेते हजर नव्हते. आलेल्या नेत्यांत काही माजी मुख्यमंत्री होते. व्यासपीठावर गणतीच केली असती तर या मेळाव्याला निदान डझनभर तरी माजी मुख्यमंत्री आले असल्याचे लक्षात आले असते. ममता बॅनर्जी या विद्यमान मुख्यमंत्री उपस्थित होत्या. नितीशकुमार यांचे राजकारण हा मेळाव्याचा केेन्द्रबिंदू असल्यामुळे शरद यादव यांच्या उपस्थितीला महत्त्व होते आणि तेही आपली उपस्थिती महत्त्वाची आहे या भावनेतून वावरत होते.

Leave a Comment