सोने खरेदीसाठी पॅनकार्ड लागणार


सोने खरेदीसाठी पॅनकार्ड बंधनकारक करावे असा प्रस्ताव आर्थिक नियंत्रण समितीने सरकारला दिला असल्याचे समजते. यापूर्वी दोन लाखांपेक्षा अधिक किंमतीचे सोने खरेदीसाठी पॅनकार्ड नंबर देणे बंधनकारण झाले आहेच मात्र अजूनही सोने खरेदी विक्री कारभारात होत असलेली करचुकवेगिरी थांबलेली नाही. यासाठी सोने खरेदी मग ती कितीही किमतीची असो पॅनकार्ड असणे गरजेचे असल्याचे या समितीचे म्हणणे आहे.

सोने खरेदी विक्रीत होत असलेली कर चोरी उघड होण्यासाठी सध्या पुरेसे पर्याय नाहीत. त्यामुळे सोने खरेदीत होत असलेला प्रत्येक व्यवहार इलेक्ट्राॅनिक रजिस्ट्रेशनच्या सहाय्याने नोंदला जावा असे समितीचे म्हणणे आहे. सोने करचोरी शोधण्यासाठी पुरेसा डेटा हवा असेही त्यांचे म्हणणे आहे. जगातील अन्य देशांच्या तुलेनेत भारतात घरात सोने ठेवण्याचे प्रमाणे मोठे आहे. त्यामागे कर वाचविणे हा मुख्य उद्देश असतो असेही दिसून आले आहे. हे सोने बँकेत वा अन्य जागी गुंतविले गेले तर त्यावर चांगला परतावा मिळू शकतो याबाबात जागृती करणे आवश्यक असल्याचे मतही समितीने नोंदविले आहे.

Leave a Comment