फेसबुकने युजर्ससाठी वेळोवेळी अनेक प्रकारचे इमोजी सादर केले आहेत. त्यात आता संगणक व मोबाईल अॅपसाठी सादर केलेल्या नव्या आकर्षक इमोजीं स्टीकर्सची भर पडली आहे. फेसबुकच्या वेबसाईटवर पहिल्या १२५ यलो टोन स्टीकर्समध्ये तेवढच्या संख्येने नवी स्टीकर्स जारी करण्यात आली आहेत. अर्थात सध्या ही नवी स्टीकर्स डेस्क टॉप व मोबाईल अॅपसाठी असली तरी लवकरच ती फेसबुक मेसेंजर युजर्सनाही वापरता येणार आहेत.
फेसबुकने संगणक व मोबाईल अॅपसाठी आणले नवे इमोजी
आजकाल शब्द वापरण्याऐवजी विविध भावना व्यक्त करण्यासाठी इमोजींचा मोठा वापर केला जात आहे. मायक्रोसॉफ्टनेही ५२ हजार नवे इमोजी सादर केले असून विविध रंगाचे व सिंगल फॅमिलीचे प्रतिनिधित्व ते करतात.