इंडोनेशियातील गणपती

indonesia
फार प्राचीन काळापासून पूर्व आशिया आणि भारतीय उपखंडात गणपती पुजला जातो आहे. प्राधान्याने हिंदू समाजाची ही देवता परदेशात त्याकाळात हिंदू राजानी केलेली राज्ये आणि भारतातून त्या देशात गेलेले व्यापारी यांच्यामुळे गेली आणि कांही काळानंतर तेथील समाजजीवनात मिसळून गेली. १० व्या शतकापूर्वीपासून दक्षिण पूर्व आशियात भारतातून अनेक व्यापारी गेले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर गणेशही नेला. आजही इंडोनेशियाच्या जावा, बाली, बोर्नियो, बांडुंग, अशा असंख्य बेटांवर गणेश पुजला जातो इतकेच नव्हे तर मुस्लीम देश म्हणून ओळख असलेल्या या देशात गणेशाची प्रतिमा तेथील चलनी नोटेवरही पहायला मिळते.

इंडोनेशियात गणेश ही बुद्धी आणि व्यापाराची देवता मानली जाते. येथील बांडुंग शहरात गणेश रस्ता नावाचा मार्ग आहे. जावा बेटावर १ ल्या शतकातील गणेश मूर्जी माऊंट रक्ष येथे सापडली होती आणि या देशात किमान १५ ठिकाणे अशी आहेत की तेथील उत्खनतात ठिकठिकाणी गणेशमूर्ती सापडल्या आहेत. आज इंडोनेशियात स्वतंत्र स्वरूपातील गणेश मंदिरे नाहीत मात्र शिवमंदिरातच गणेश मंदिरे असलेली असंख्य ठिकाणे आहेत. ११ व्या शतकातली एक सुंदर गणेश मूर्ती पूर्व जावामधील म्युझियम ऑफ इंडियन आर्टच्या संग्रहालयात पाहायला मिळते.

प्रंबानन हा इंडोनेशियातील मोठा मंदिर समुह असलेला भाग आहे. येथेही ९ व्या शतकातील गणेश मूर्ती आहे. सुरबाया, जोगकर्ता, बारो टेंपल, बाली, मदुरा अशा अनेक बेटांवर गणेश पुजला जातो. इंडोनेशियात गणपतीला गजा असे संबोधले जाते. पुरा लुहुर उलुबटू या बालीमध्ये असलेल्या ठिकाणी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना मोठ्या गणेश मूर्ती आहेत. त्या १५ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.

Leave a Comment