अमेरिकन नू मोबाईल कंपनीचे चार स्मार्टफोन भारतात दाखल


अमेरिकन नू मोबाईल कंपनीने भारतीय मोबाईल बाजारात पदार्पण करतानाच चार स्मार्टफोन एकाचवेळी सादर केले असून हे सर्व बजेट स्मार्टफोन्स आहेत. क्यू ५००, क्यू ६२६, एम थ्री व एक्स ५ अशी या स्मार्टफोनची नांवे असून त्यांच्या किमती ९९९९ ते १५९९९ दरम्यान आहेत. या कंपनीचे फोन अमेरिका, यूएस, इंडोनेशिया व अन्य देशांच्या बाजारातही विकले जात आहेत. हे सर्व फोर जी स्मार्टफोन आहेत.

क्यू ५०० हा सर्वात स्वस्त असून त्याची किंमत ९९९९ रूपये आहे तर एम थ्री १२४९९, क्यू ६२६ १२९९९ व एक्स ५, १५९९९ ला आहे. झिंक अॅल्युमिनियम बॉडी, फिंगरप्रिंट सेन्सर, ५.५ इंची फुल एचडी डिस्प्ले, स्मार्टवेक तंत्रज्ञानाचा वापर, अँड्रोईड नगेट ओएस, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी,१३एमपीचा ऑटोफोकस रियर कॅमेरा, ५एमपीचा फ्रंट कॅमेरा, ड्युअल सिम अशी एक्स फाईव्हची फिचर्स आहेत. एम थ्री साठी २ जीबी रॅम,१६ जीबी मेमरी, ८ एमपीचा रियर, ५एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे.

क्यू ६२६ साठी फ्रंट बॅक पॅनल ग्लास मेटलचे आहे तर क्यू ५०० साठी मेटल बॉडी दिली गेली आहे. या दोन्ही फोनसाठी ५ इंची एचडी डिस्प्ले, २ जीबी रॅम, ८ एमपीचा रियर व ५ एमपीचा फ्रंट कमरा आहे. क्यू ६२६ ची इंटरनल मेमरी ३२ जीबी तर क्यू ५०० ची १६ जीबी आहे. या सर्व फोनची मेमरी मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे.

Leave a Comment