बाबा रामरहिम च्या लग्झरी कार्सचा ताफा पहिलात?


सोमवारी सच्चा डेरा सौदाचे बाबा रामरहिम यांना बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना सोमवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. हे बाबा नेहमीच चर्चेत राहिले आहेत कारण ते केवळ धर्मगुरू नाहीत तर अॅक्टर, डायरेक्टर, गायक, निर्मातेही आहेत आणि त्यांच्याकडे अनेक लग्झरी कार्सचा ताफा आहे. हे बाबा अतिश्रीमंतांपैकी एक आहेत.


यांच्या कार कलेक्शनचे वैशिष्ठ असे की यातील अनेक कार बाबा स्वतःच्या पसंतीने मॉडिफाय करून कस्टमाईज करतात. त्यांच्या बुगाटी व्हेयरॉनशी साधर्म्य दाखविणार्‍या कारला भगवानाचा रथ म्हटले जाते. वास्तविक ही जुनी होंडा अॅकार्ड व्ही सिक्स सेदान असून तिला बाबांनीच हा लूक दिला आहे. तसेच अपघात झालेल्या ह्युंडाई सेँट्रोलाही त्यानी कस्टमाईज लूक देऊन एकदम वेगळी कार तयार केली आहे. शिवाय बाईक कस्टमाईजकरून बनविलेले अॅग्रो जेटर, हिरो होंडा करिश्माला बदलून साहिब एक दिल कॉन्सेप्ट कार, होंडा मॉडिफाईड करून बनविलेली ऑफ रायडर कार, सुपर बाईक असे हे भलेप्रचंड कलेक्शन आहे.