जग्वारची एफ टाईम एसव्हीआर कार लाँच


जग्वारने भारतीय बाजारातील त्यांचा पोर्टफोलियो विस्तारताना रेंज टॉपिंग एफ टाईम एसव्हीआर कुपे कार लाँच केली असून त्याचे कन्वर्टिबल व्हर्जनही लाँच केले आहे. या दोन्ही कारच्या किमती अनुक्रमे २.४५ कोटी व २.६३ कोटी (एक्स शो रूम) आहेत.

या कारला ५ लिटरचे व्ही ८ इंजिन ८ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह दिले गेले आहे. कुपेचे वजन १०७५ किलो असून ही कार ० ते १००किमी वेग फक्त ३.७ सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२२ किमी. कव्हर्टिबल माडेलचे वजन १५ किमी जादा असल्याने तिचा टॉप स्पीड ताशी ३१६ किमी आहे. एरोडायनामिक्स डिझाईनच्या कूपेला लाईटवेट टायटानियम एक्झॉस्ट व २० इंची फोर्ज्ड अॅलॉय व्हील्स दिली गेली आहेत. या कार्सचे बुकींग सुरू झाले आहे. ५ ते ६ महिन्यांत त्यांची डिलिव्हरी दिली जाणार आहे. या कार मर्सिडीज एएमजी जीटीआर, निस्सान जीटीआर, पोर्श ९११ टर्बो एस सुपरकारशी स्पर्धा करतील.