देशात अशीही आहेत आधारकार्ड


सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीचा खासगीपणा किंवा प्रायव्हसी हा पायाभूत हक्क असल्याचा निर्णय दिल्यामुळे सरकारने बंधनकारक केलेल्या आधारकार्ड योजनेवर काय परिणाम होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सरकार आधारकार्ड बंधनकारक करू शकणार का यावर अनेक तर्कवितर्क होऊ लागले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात देशात विविध प्रकारची आधारकार्ड तयार झाली आहेत. अगदी जन्मजात बाळापासून पशुंपर्यंत आधारकार्ड बनविली गेली आहेत. त्यात देवांचाही समावेश आहे. सोशल मिडीयावर ही कार्ड व्हायरल झाली आहेत.


झारखंड राज्याने सरकारी आदेशानुसार एप्रिल २०१७ पासून राज्यातील गायींची आधारकार्ड बनविण्याची सुरवात केली असून आत्तापर्यंत अशी १२ हजार आधार दिली गेली आहेत. त्यात गायींच्या कानावर टॅग लावण्यात आले आहेत. त्यावर मालकाचे नांव, पत्ता, गायीची दूध देण्याची क्षमता, अ्राजारपण कधी आले, किती विती झाल्या यांची माहिती आहे.. झारखंडने गायींबरोबरच अन्य पशूंची आधारकार्ड बनविली जाणार असल्याचे जाहीर केले असून अशी २० लाख आधारकार्ड बनविली जाणार आहेत. त्यात बेवारस पशुंचाही समावेश आहे. त्यावर त्यांचे वय, जात, लिंग, उंची, रंग व शिंगे यांची माहिती नोंदली जाईल.


राजस्थानातील सिकर जिल्ह्यातील दातारामगढ गावात बजरंगबली हनुमानाचे आधारकार्ड तयार केले गेले आहे. त्याचा नोंदणी नंबर व आधार कार्ड नंबरही दिला गेला आहे. वडीलांच्या नावाच्या जागी पवनजी असे नोंदले गेले असून या कार्डाचा नंबर आहे २०९४-७०५१-९५४१.


मध्यप्रदेशात कुत्र्याचे आधारकार्ड तयार केल्याबद्दल जुलै २०१५ मध्ये एका सुपरवायझरला अटक करण्यात आली हेाती. त्याने कुत्र्याच्या नावावर आधारकार्ड तयार केले त्यात कुत्र्याची सर्व माहिती भरली गेली होती. कुत्र्याचे नांव टॉमीसिंग व वडीलांच्या जागी शेरूसिंग असे लिहिले गेले होते. जन्मतारीख होती २२ नोव्हेंबर २००९.


हरियानातील सिरसा येथे जन्मजात बाळाचे आधारकार्ड तयार केले गेले. १२ दिवसाच्या या बाळाचे नामकरण केले गेले नसल्याने नावाच्या जागी मीनाक्षी यांचे पहिले मूल अशी नोंद केली गेली होती. बाळाचा फोटोही दिला गेला होता.


महाराष्ट्रात एका कुटुंबाने लग्नाची पत्रिका आधारकार्डच्या स्टाईलमध्ये छापून त्यावर लग्नाचे ठिकाण, वेळ व तारीख यांची माहिती दिली होती. लग्नपत्रिकेवर वधूवरांचे फोटो छापले गेले होते.


बॉलीवूडची बेबी डॉल सनी लियोनी हिचे आधारकार्ड सोशल मिडियावर व्हायरल झाले होते व त्यावर खूपच ट्रेडिंग झाले. सनीच्या जन्मतारखेत १९८१ साल दिले गेले व आधार नंबर होता ४४४४-५५५५-६६६६

Leave a Comment