आज संध्याकाळपासून सुरू होणार जिओ फोनची प्री-बुकिंग


मुंबई – आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून रिलायन्स कंपनीच्या बहुचर्चित जिओ फोनची प्री-बुकिंग सुरू होणार आहे. कंपनीने ५० कोटी मोबाइल यूजर्सपर्यंत जिओ फोन पोहोचवण्याचा निर्धार केला असून पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ हा फोन असून रिलायन्सने त्याचे वर्णन इंडिया का इंटेलिजन्ट फोन असे केले आहे. तसेच दर आठवड्याला ५० लाख फोनची निर्मिती करण्याचे लक्ष रिलायन्सने समोर ठेवले आहे.

२४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता जिओफोनची बुकिंग सुरू होणार असून ग्राहकाला या फोनच्या प्री-बुकिंगसाठी ५०० रूपये भरावे लागणार आहेत. फोनचे प्री-बुकिंग रिलायन्सच्या वेबसाइटवर, मायजिओ अॅपवर आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरमध्ये केले जाईल. कंपनीने या फोनची किंमत सिक्युरिटी डिपॉझिटच्या माध्यमातून १५०० रुपये ठेवली आहे, तीन वर्षांनंतर या पैशांचा पूर्ण रिफंड ग्राहकांना मिळणार आहे. प्री बुकिंग करतान ग्राहकांना ५०० रूपये भरावे लागणार आहेत. तर उर्वरीत १००० रूपये फोन मिळाल्यानंतर भरायचे आहेत.

Leave a Comment