‘सारा’च्या रूपाने ‘फिशपॉण्ड’, मग कसा मिळणार थारा !


मुंबई – फेसबुक ,ट्विटर ,व्हाटसअप आदी सोशल मीडियामुळे लोकं जरा जास्तच ‘सोशल ‘ झाली आहेत. विशेषतः फेसबुक म्हणजे काहीही करायचे आणि ‘एफबी’वर अपलोड करायचे ..अगदी एखादा अपघातात तडफडत असेल ,मस्करीत पुलावरून उडी मारत असेल त्यांना वाचविण्यापेक्षा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्यासाठी धडपडणाऱ्या ‘सोशल’प्रेमींना मात्र नव्याने दाखल झालेले ‘सारा ‘ अॅपला नको थारा अशीच म्हणण्याची वेळ ओढवणार आहे.

काय आहे ‘सारा ‘ अॅप तर ते आहे एकप्रकारचे फिशपॉण्ड. काही गोष्टी दुसऱ्याला त्याच्या तोंडावर बोलता येत नाहीत. तरीही आडून आडून त्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न होतोच. कॉलेजमध्ये पूर्वी फिशपॉण्डचा प्रकार होता . कुणाबद्दल काहीही बोलायचे तर मोकळेपणाने बोलता यावे आणि कोण बोलतेय ते समोरच्या व्यक्तीला कळायलाही नको अशा पद्धतीचे हे‘सारा’ अॅप आहे सध्या ‘सारा’ ने चांगलाच जोर धरलाय… पण काहीजणांना हे अॅप मानसिकदृष्टय़ा आजारी करू लागले आहे. या अॅपद्वारे दुसऱ्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कारण दुसऱ्याला वाईट बोलणे आता सहज शक्य झाले आहे. शिवाय टीका करणाऱ्यांची नावे गुप्त राहणार असल्याने काही अल्पसंतुष्ट लोक या अॅपचा गैरफायदा घेत वाईट कमेंट्सही पास करू शकतात. आता फेसबुकवर लाईक ,कमेंट्स याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना ‘सारा’ च्या रूपाने खडेबोल ,टीका कशी सहन होणार हा एक प्रश्न आहे.

Leave a Comment