सूर्यग्रहणादिवशी जन्मली, नांव ठेवले एक्लिप्स


यंदा १०० वर्षांनंतर अमेरिकेत प्रथम खग्रास सूर्यग्रहण दिसले व याच सूर्यग्रहणाच्या मूहूर्तावर जन्माला आलेल्या मुलीचे नांव आईवडीलांनी ऐनवेळी बदलून एक्लिप्स ठेवले व दीर्घ काळानंतर दिसलेले सूर्यग्रहण यादगार बनविले. दक्षिण कॅरोलिनात २१ ऑगस्टला सकाळी ही कन्या जन्माला आली असे समजते.

या मुलीच्या आईचे नांव फ्रिडम असे आहे. ती सांगते आमचे बाळ सूर्यग्रहण सुरू असतानाच जन्माला आले. त्यामुळे आम्ही तिचे पहिले ठरविलेले व्हायोलेट हे नांव रद्द करून एक्लिप्स असे नांव ठेवण्याचे ठरविले. आमच कुटुंबियांना हे नांव ऐकून प्रथम धक्का बसला पण आता त्यांनाही हे नांव आवडले आहे. आम्ही तिला किलप्सी नावाने हाक मारू शकतो.

सूर्यग्रहणात जन्माला आलेल्या या बाळाच्या जन्माबद्दल हॉस्पिटलनेही आपला आनंद व्यक्त केला व सोशल मिडीया फेसबुकवर हे नांव शेअर केले तसेच नवजात बाळाला टोटल सोलर एक्लिप्स असे शब्द असलेला जंपसूटही भेट म्हणून दिला. एक्लिप्स ६ पौंड वजनाची असून ती अगदी स्वस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave a Comment