बिजिंगमधील गर्दी कमी करण्यासाठी नवीन शहराची बांधणी


चीन सरकारने राजधानी बिजिगमधील लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी नवी उपाययोजना केली असून बिजिंगजवळच एका नवीन शहराची स्थापना केली जात आहे. या नव्या शहरात बिजिंगमधील ३ ते पाच लाख लोकांना स्थलांतरीत केले जाणार आहे. नव्या शहराचे नांव शियोंगान असे असून राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी हे नवे शहर म्हणजे नवे इकॉनॉमिक सेंटर असेल व बिजिंगच्या आसपासचा परिसर जोडण्याचे काम ते करेल असे सांगितले.

बिजिंगची लोकसंख्या २०२० पर्यत २ कोटी ३० लाखांवर नियंत्रित केली जाणार आहे. सध्या येथे २.२ कोटी नागरिक राहात आहेत. त्यामुळे आत्तापासूनच जनसंख्येवर नियंत्रणाचे उपाय केले जात आहेत. महापौर काई क्वी म्हणाले की या मोहिमेसाठी महापालिका मार्गदर्शक निधी म्हणून १० अब्ज युआन देणार आहे. गतवर्षी सहा जिल्ह्यात प्रथमच नकारात्मक जनसंख्या वृद्धी झाली आहे. नव्या मोहिमेत बिजिंगमधील १५८ बाजार व विक्री केंद्रे स्थानांतरीत करण्यात येणार आहेत तसेच प्रदूषण करणार्‍या ५०० कंपन्या बंद केल्या जाणार आहेत.

Leave a Comment