डब्ल्यू डब्ल्यू ई रेसलर अंडरटेकरशी तुलना केली जाते त्या पगानीकडून अनेकदा त्यांच्या कारचे उत्पादन बंद केले असल्याच्या खबरा दिल्या जातात. मात्र पगानीने पुन्हा एकदा झोंडा बर्चेट्टा ही सुपरकार ब्रँड न्यू अवतारात सादर केली आहे. कॅलिफोर्नियातील माँटेरे कार वीकमध्ये ही कार सादर होताच सर्व जगाचे ती आकर्षण बनली आहे. कंपनीचा संस्थापक होरासिया पगानी याच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्याने व त्याच्या टीमने ही कार तयार केल्याचे सांगितले जात आहे. १८ वर्षांपूवी त्यांची पहिली कार तयार केली गेली होती.
पगानी झोंडा बर्चेट्टा- नवी सुपरकार
पगानीने २०१४ला झोंडा रेव्होल्यूशन कार सादर केल्यानंतर प्रॉडक्शन बंद केल्याची घोषणा केली होती. आता ते नव्या कारसह पुन्हा अवतरले असून या कारची फक्त तीन युनिट बनविली गेली आहेत. त्यातील दोन साठी अगोदरच ग्राहक निश्चित केले गेले आहेत. झोंडा बर्चेट्टा इतकी स्टायलीश आहे की तिच्यावर नजर ठरणे अवघड. कार्बन फायबरची बॉडी असलेली ही ओपन टॉप कार आहे. तिला ७.३ लिटरचे एएमजी व्ही १२ इंजिन दिले गेले आहे. ० ते १०० किमीचा वेग ती २.८ सेकंदात घेते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३२० किमी.
कारच्या मागे झोंडाची सिग्नेचर ३ सक्र्युलर लाईट आहेत शिवाय रियर विंगच्या वर नवे एलईडी टेल लाईटही आहेत. कारला सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले गेले आहे.