लंडन – भारतापासून हजारो मैल दूर लंडनमध्ये तयार झालेला समोसा सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. या समोश्याची चर्चा लंडनमधील बऱ्याच टीव्ही चॅनल आणि वृत्चपत्रात होते आहे. लंडनमध्ये दुनियेतील सगळ्यात मोठा समोसा मंगळवारी लोकांनी पाहिला. १५३.१ किलो एवढे त्या समोश्याचे वजन आहे. हा समोसा तयार करायला तब्बल १५ तास लागले होते. हा समोसा टीमच्या प्रयत्नानंतर १५ तासांनी तयार झाला. तसेच हा भलामोठा समोसा तयार करण्यासाठी डझनभर स्वयंसेवकांनी काम केले आहे.
हा समोसा पूर्व लंडनमधील एका मशिदीमध्ये मुस्लीम समाजाच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका संघटनेने तयार केला असून संघटनेतील स्वयंसेवकांकडून हा समोर तयार होत असताना तेथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही उपस्थित होते. एका भल्यामोठ्या वायर मेशवर हा समोसा तयार करण्यात आला आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आले होते. समोसा तयार करताना सगळ्यांच्याच मनात भीती होती. समोसा तयार करत असताना तो तुटेल, असे प्रत्येकाला वाटत असल्याचे, प्रोजेक्ट मॅनेजर फरिद इस्लाम यांनी सांगितले.
लंडनमधील लोकांनी पाहिला तब्बल १५३ किलो वजनाचा समोसा
सगळ्या नियमांचे १५३ किलो वजनाचा समोसा तयार करत असताना पालन केले गेले. समोश्याची चव चाखल्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या कर्मचाऱ्यांनी त्याला दुनियेतील सगळ्यात मोठा समोसा असल्याता किताब दिला, असे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे कर्मचारी प्रवीण पटेल यांनी सांगितले.