नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी भारतीय बाजारपेठेत जर्मनची प्रसिद्ध आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीजने आपली नवी जीएलसी ४३ कार लाँच केली आहे. जीएलसी रेंजमध्ये तिसरा आणि सर्वात पॉवरफुल मॉडेल असणार आहे.
भारतीय बाजारपेठेत दाखल झाली मर्सिडीजची जीएलसी ४३
या कारमध्ये ३.२ लिटरचे ट्विन टर्बो व्ही ६ पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. त्याचबरोबर ३६७ पीएस आणि ५२० एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये असणार आहे. ९ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स या कारमध्ये देण्यात आले आहे. या कारचा टॉपस्पीड २५० किमी/प्रतितास असून १९ इंच ५ स्पॉक एएमजी अलॉय व्हील्स्, एएमजी बॉडी किट देण्यात आले आहे. यागाडीची किंमत ७४ लाख ८ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.