धार्मिक पर्यटनासाठी सुलभ ‘दर्शन ‘सुविधा


देशातील ६० मंदिरांचा समावेश
मुंबई – देशातील ६० मंदिरांमध्ये आता तुम्हाला रांगेत तिष्ठत थांबण्याची वेळ येणार नाही शिवाय अभिषेक असो किंवा दर्शन सुलभही होणार असून निवासाची व्यवस्थाही सुकर होणार आहे. ‘दर्शन’ या नावाने धार्मिक पर्यटनासाठी ही सुविधा एसओटीसी कंपनीने सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात धार्मिक पर्यटन हा अत्यंत आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. ही गोष्ट लक्षात घेता एसओटीसी नावाच्या पर्यटन कंपनीने ‘दर्शन’ या नावाने धार्मिक पर्यटन आकर्षक पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने देशातील ६० निवड मंदिरांची निवड केली आहे. ज्यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, द्वारका आणि सोमनाथ मंदिर, कामाख्या मंदिर अशा मंदिरांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील ५ ज्योतिर्लंग, पंच महाभूतांचे दर्शन अशा वेगळ्या धार्मिक सहलींचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.या सहलींचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरांमध्ये पर्यटकाच्या नावाने आधीच पूजेची वेळ निश्चित केलेली असेल, त्यामुळे त्याचा वेळ वाचेल. पूजा, होम अभिषेक यांचा या सहलीसाठीच्या किंमतीमध्ये समावेश असणार आहे. मंदिरांमध्ये असलेल्या गर्दीबाबत आणि प्रचंड मोठ्या रांगाबाबत कंपनीने म्हटले आहे कि आम्ही रांगा तोडून किंवा चुकीच्या मार्गाने पर्यटकांना मंदिरात नेणार नाही, मात्र या पर्यटकांची पूजा आधीच निश्चित झाली असल्याने त्यांना नियमानुसार प्राधान्य दिले जाईल. पर्यटकांची मंदिरात व्यवस्थित सोय व्हावी म्हणूनच सुरूवातील ६० मंदिरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी इ-पूजा या ऑनलाईन पोर्टलसोबत हातमिळवणी केली आहे. या पर्यटकांना सुलभ दर्शन आणि पूजेसोबेतच राहण्याची आणि फिरण्याची उत्तम सोय केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment