नव्या कार्यालयावर अॅपल कर्मचारी नाखूष- नोकरी सोडण्याच्या तयारीत


अॅपल इंकने त्यांचे नवे कार्यालय अत्याधुनिक रूपात कॅलिर्फार्नियातील क्युपार्टिनो येथे बांधले असले तरी या स्पेसशीपप्रमाणे भासणार्‍या कार्यालयात जाण्यास कर्मचारी नाखूष असून अनेकांनी या कार्यालयात काम करण्यापेक्षा नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी केली असल्याचे समजते. टेक ब्लॉगर जॉन ब्रुगर याने अनेकांकडून फिडबॅक घेतल्यानंतर ही माहिती दिली आहे.गेली अनेक वर्षे जॉन अॅपल कव्हर करत आहे.

टॉक कुक यांनी हे नवे अत्याधुनिक कार्यालय बांधताना या कार्यालयावर कर्मचारी खूष झाले पाहिजेत अशा विचाराने ते बांधले. त्यासाठी ३२ हजार कोटी खर्च करण्यात आले. मात्र कुक यांचे फासे उलटे पडल्याचे दिसून आले आहे. या कार्यालयातील ओपन फ्लोअर प्लॅनवर वरीष्ठ कनिष्ठ कर्मचारी नाराज आहेत. अॅपल कर्मचार्‍यांना केबिन्समध्ये काम करण्याची सवय आहे मात्र या फ्लोअरवर एकमेकांसमोर टेबलावर बसून त्यांना काम करावे लागणार आहे. यामुळे त्यांच्या प्रायव्हसीवर आक्रमण होते आहे. माध्यमिक शाळेसारखी उघड्या जागेत बाकांवर बसून काम करण्याची ही पद्धत त्यांना अजिबात रूचलेली नाही. त्यामुळे अनेकांनी मेल करून नव्या कार्यालयात शिफ्ट व्हावे लागले तर राजीनामा देऊ अशी धमकी दिली असल्याचे समजते.

Leave a Comment